मूर्तिजापूर - विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा राज्यातील मोठा महोत्सव असून मतदारांनी मतदानाचा हक्क धर्मनिरपेक्ष भावनेने बजावावा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मूर्तिजापूरात नगर परिषदेच्या प्रांगणात राज्याच्या नकाश्यावर मानवी साखळी तयार करून मतदार जनजागृती करण्यात आली.
मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णव बी. यांच्या निर्देशानुसार स्वीप अंतर्गत नगर परिषद प्रांगण मुर्तिजापूर येथे आज ता.(१२) रोजी दुपारी ४ वाजता मतदार जनजागृती कार्यक्रम निमित्त महाराष्ट्र राज्य नकाशयावर मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाची नियोजनबद्ध पद्धतीने सुरुवात करण्यात आली. नियोजना प्रमाणे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदिपकुमार अपार यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी अशोक बांगर, गट शिक्षणाधिकारी संजय मोरे, प्रशासन अधिकारी न.प. , सर्व केंद्र प्रमुख, गट साधन केंद्र मुर्तिजापूर येथील सर्व कर्मचारी, तहसील कार्यालय कर्मचारी सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. लोकशाहीत मतदानाचे महत्त्वा बाबत व आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. या मानवी साखळी कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले.हा नाविण्यपूर्ण उपक्रम प्रकाशवाट प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात पार पडला.करीता तहसील, पंचायत समिती, नगर परिषद मूर्तिजापूर येथील सर्व कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन उपक्रम यशस्वी केला. उपस्थित सर्वांनी येत्या २० तारखेला कुटुंबासह मतदान करण्याविषयी शपथ घेण्यात आली.