मुर्तिजापूर मतदारसंघात गृह मतदान दिव्यांग(AVPD), ज्येष्ठ मतदारांसाठी (AVSC) मतदानाला प्रारंभ

 




मूर्तिजापूर - विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दिव्यांग(AVPD) व 850जास्त वयोवृद्ध (AVSC) मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी मुर्तिजापूर मतदारसंघात गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या करिता चा मतदान रूट प्लॅन तयार करण्यात आला असून एकूण 15 मतदान पथके मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील पात्र ठरलेल्या मतदारांचे घरी जाऊन टपाली मतदान प्रक्रिया राबविणार आहेत.या बाबतची पूर्व सूचना संबधीत मतदारांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांचे माध्यमातून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 4322 व ८५ वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध मतदारांची संख्या 3114 अशी एकूण -7426 आहे. गृहमतदानसाठी भारत निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या तारखांना म्हणजेच दिनांक 22 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत मतदार यादी मध्ये मार्क केलेल्या दिव्यांग व 85 वर्ष व त्यावरील वयाच्या मतदारांची मतदान केंद्रस्तरिय अधिकारी यांनी भेट घेऊन त्यांना भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले नमुना 12 D चे अर्ज उपलब्ध करून दिले पैकी 444 मतदारांनी नमुना 12 D अर्ज भरून दिले आहेत. त्यामध्ये अपंगत्वाबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे दिव्यांग 106 व 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांचे 338 अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे हमी पत्र भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत. विधानसभेत जास्तीत-जास्त मतदान होण्यासाठी निवडणूक यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदार साक्षरता अभियान अर्थात 'स्वीप' (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरोल पार्टीसिपेशन) अंतर्गत उपक्रम राबवण्यात येत आहेत. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सोय करून दिली आहे. त्याच प्रमाणे भारत निवडणूक आयोगावर विकसित केलेल्या सक्षम या मोबाईल अँप द्वारे देखील दिव्यांग मतदार त्यांचे साठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी साठी मतदान केंद्रावर स्वयंसेवक,व्हील चेअर, तसेच त्यांचे घरापासून मतदान केंद्रावर पोहोचविणे व मतदान केंद्रावरून मतदानानंतर घरी जाण्यासाठी ची मागणी नोंदवू शकतात. तसेच अंध मतदारांकरिता ब्रेल लिपीतील मतदार माहिती पुस्तिका देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक मतदाराला त्यांचे मतदान केंद्र बाबतची माहिती देण्यासाठी मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील एकूण 390 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांचे मार्फत मतदार चिट्ठी (VIS) चे वितरण सुरू करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post