उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूर्तिजापूरमध्ये आज करणार ‘शंखनाद’...!

 



आ.हरिष पिंपळे ‘लोक’ युद्धासाठी होणार सज्ज..!




विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची शहरात पहिलीच प्रचार सभा



मूर्तिजापूर :- विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार हरिष पिंपळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी समता नगर येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाच्या शेजारील मैदानात दुपारी १२. ३० वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही मूर्तिजापूर शहरातील पहिलीच प्रचार सभा होणार आहे.

या सभेला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी महायुतीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असून ५ ते १० हजार नागरिकांची बसण्याची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. तर महिला व पुरुष यांच्या करिता स्वातंत्र्य व्यवस्था असून विशेष आमंत्रित व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचीही स्वातंत्र विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कळविण्यात आले आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post