अशोकनगर - अशोकनगर येथे स्व.भावेश अमोल निंभोरकर याची प्रकृतीठिक नसल्यामुळे त्याची प्राणज्योत मावळली त्या निमित्ताने कोणतीही विधी न करता महापुरुषांच्या विचारांना अनुसरुन वाघ कुटुंब व गुरुदेव सेवा मंडळ यांनी मौन श्रद्धांजली चे आयोजन करण्यात आले होते. सामुदायिक प्रार्थनेनी कार्यक्रमाची सुरुवात करून त्यानंतर मौन श्रद्धांजली भावेश ला अर्पण केली. त्यावेळी उपस्थित अध्यात्म गुरूकुल गुरूकुंज मोझरी चे युवा व्याख्याते तुलसीदास झुंजुरकार उपस्थित होते ते म्हणाले की,जन्मास येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकदिवस आयुष्य सोडून निघावं लागतं पण माणुस कितीही मोठा असला तरी शेवटी माणूस हा कर्माने मोठा होतो आणि तेच कर्म करत आपलं कर्तुत्व इथे ठेवून माणूस गेल्यानंतरही तो प्रत्येकांच्या अंतकरणात सदैव अमर असतो असा संदेश त्यांनी दिला व त्यानंतर राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प हनुमंत ठाकरे गुरुजी यांच्या सुमधुर वाणीने किर्तन सेवा झाली.
कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता वाघ कुटुंबियांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे.त्यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकेश कोल्हे यांनी केले. सुरेश ठाकरे, सचिन तिडके गुरुदेव सेवा मंडळ चिंचपुर सर्व प्रचारक व आयोजक मयूर वाघ व संपूर्ण गावकरी उपस्थित होते.