भारतीय जनता पार्टीच्या नवख्या उमेदवारावर पक्षांतर्गत मोठी नाराजी ; जनतेतही नाराजीचा सुर

उमरखेड विधानसभेमध्ये कमळ फुलण्याआधीच कोमजले
! श्रीकांत राऊत यवतमाळ महागांव : उमरखेड महागांव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पिछाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीत यावेळी निष्ठावतांना डावलून काँग्रेसमध्ये तप घालवलेल्या किसनराव वानखेडे या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीने घोडचूक केली असे प्रचाराच्या रणधुमाळी कमळ कोमजलेल्या अवस्थेत उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ पहावया मिळत आहे . भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजेंद्र नजरधने हे मनसेचा झेंडा घेऊन मैदानात उतरले त्यांना वाढता प्रतिसाद दिसत आहे .राजेंद्र नजरधने यांनी भारतीय जनता पार्टीतिल जुने नेते व कार्यकर्ते यांचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राजेंद्र नजरधने यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला झालेली भरगच्च गर्दी याची साक्ष देते. उमरखेड व महागाव या दोन तालुक्यात विभागलेल्या विधानसभा मतदारसंघात नेहमी महागांव तालुक्याच्या निर्णनायक मतांवर लोकसभा असो की विधानसभा उमेदवारांचे भवितव्य ठरविणारा तालुका म्हणून महागांव तालुका ओळखल्या जातो राजेंद्र नजरधने हे महागाव तालुक्यातील भूमिपुत्र उमेदवार आहेत. तालुक्यातील जनतेशी त्यांची नाळ आहे त्यांची कारकीर्द चांगली होती भ्रष्टाचाराचे किंवा कमिशन खोरीचे कुठलेही आरोप त्यांच्यावर झाले नाही व 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भरगच्च मतांनी विजय झाला. राजेंद्र नजरधने यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षादेश पाळत आपली उमेदवारी मागे घेतली होती. पक्षासोबत प्रामाणिक राहून सुद्धा त्यांना यावेळी उमेदवारी नाकारली त्यांच्यावरील झालेल्या अन्याय हा जनतेला स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्या विषयी सहानुभूतीची लाट यावेळी भाजपाला डुबवणार हे मात्र निश्चित आहे. भारतीय जनता पार्टीने नवखा उमेदवारस नेते व कार्यकर्ते यांचा अंतर्गत विरोध होत आहे. शेठजीने लादलेला काँग्रेसमधील कार्यकर्ता भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे मतदार हे मनसेचे राजेंद्र नगरधने व काँग्रेसचे साहेबराव कांबळे अपक्ष विजयराव खडसे यांना पसंती देताना दिसत आहे त्यामुळे उमरखेड विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत पाहावयास मिळत आहे. नवख्या उमेदवारावर जनता नाराज ! भारतीय जनता पार्टीने काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पार्टीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे जनता नाराज असल्याची चित्र पाहावयास मिळत आहे. या नवख्या उमेदवाराने सन 2009 व सन 2014 मध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती. परंतु त्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा भारतीय जनता पार्टीकडे वळवला व भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी मिळवली त्यामुळे जनतेमध्येही नाराजीचा सुर पाहावयास मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post