गावाकडची बातमी &गाव सहेली टीम
पुणे : युवा प्रबोधन साहित्य मंच, मावळ, पुणे यांच्या दुसऱ्या वर्धान दिनानिमित्त विविध पुरस्काराची घोषणा झाली असून कला, क्रीडा, साहित्य, उद्धयोजक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारणे सन्मानित करण्यात येणार आहे. यात अमरावतीचे गझलकर, चित्रकार व सामाजिक कार्येकर्ते देवीलाल रौराळे यांना युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांनादि. 24 नोव्हेंबर 224 ला पुणे येथील पुष्पवती बहुले सभागृह, दादा दादी पार्क, तळेगाव दाभाळे येथे संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र भूषण सोहळ्यात देऊन सन्मानित करण्यात येईल.
देवीलाल रौराळे हे महाराष्ट्रभर विविध साहित्य संमेलतून सर्वांनां परिचित आहेत. ते व्यवसयाने चित्रकार असून राईटवे फाउंडेशन च्या माध्यमातून व्यसनमुक्ती सारख्या संवेदनशील विषयावर काम करतात.त्यांचा वीविध सामाजिक कार्यात सहभाग असतो.
या सोहळायला अध्यक्ष म्हणून नितीन सूर्यवंशी असतील तर उदघाटक डॉ. अमर्जी चौरे,स्वागतध्यक्ष संजय कुळकरी,प्रमुख उपस्थितीत हरिश देखणे, शिव व्याख्याते प्रा. संपत गारगोटे असतील.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण युवा महाराष्ट्र आयकोन लावणी कलाकार गौतमी पाटील, काव्या मुंबईकर,न्यू होम मिनिस्टर फेम क्रांतिनाना मालेगावकर,अभिनेत्री रेखा गायकवाड, रील स्टार मोहिनी कदम,मोनिका कंटाले असणार आहेत तर सूत्र संचालन सोनाली सुतार करणार आहे.
देवीलाल रौराळे यांचेवर या पुरस्कारासाठी समाजाच्या सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.