आगामी काळातही कोट्यावधी रुपयांचा विकास करण्यासाठी कटिबंध..हिरामण खोसकर...
गावाकडची बातमी तालुका प्रतिनिधी आनंद मगर
हिरामण खोसकर हे आदिवासी समाजातील अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक लोकांसाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघातील विकासासाठी 3300 कोटी रुपयांची विकास कामे त्यांनी आणली. आगामी काळात या मतदारसंघाचा श्वाशत विकास करण्यासाठी इगतपुरी त्रंबकरांनी घड्याळ निशाणी समोर बटन दाबून हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांना विधानसभेत पाठवावे. घोटी हरसुल येथे आधुनिक रुग्णालय व रोजगार निर्मिती आणि खरा विकास करण्यासाठी हिरा असलेल्या माणसाला म्हणजे हिरामण खोसकर यांना मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांनी घोटी येथे केले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झालेल्या या जाहिर सभेत ते बोलत होते यावेळी महायुतीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केले कार्यक्रमासाठी दोन्हीही तालुक्यातील असंख्य महिला व पुरुष नागरिक हजर होते.
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केल्यासोबत या विक्रमी जाहीर सभेत महायुतीच्या विविध राजकीय पक्षांचे जिल्हा तालुका पदाधिकारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपस्थितीत होते. नागरिकांनी यावेळी घोषणाबाजी करून जल्लोष केला सभेपूर्वी इगतपूरी महिंद्रा कंपनीचे बोर टेंबे ते सिन्नर फाटा घोटी या सभेचे स्थळ अशी विराट रॅली काढण्यात आली या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.