मूर्तिजापूर - शहरात नेहरू युवा केंद्र ,अकोला माय भारत क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार श्री . गाडगे महाराज महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग राष्ट्रीय सेवा योजना एनसीसी तथा सिद्धार्थ विद्यालय मुर्तिजापूर व नेहरू युवा बहु . क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी मुर्तीजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या सविधान दिना निमित्त शहरात सविधान पदयात्रा ,संविधान उद्देशिका पूजन , उद्देशिका वाचन , वक्तृत्व स्पर्धा , अनेक ठिकाणी संविधान उद्देशिका वाटप करण्यात आलेत या कार्यक्रमात महेशसिंग शेखावत याचे मार्गदर्शन मिळाले .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा बहु . क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विलास वानखडे यांनी केले ही संस्था कित्येक वर्षापासून कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक राष्ट्रीय उपक्रम मतदान जनजागृती रक्तदानशिबीरे व्यसनमुक्ती युवासंसद जागतिक महिला दिन योगा दिन स्वच्छता अभियान महापुरुष जयंती असे कितीतरी उपक्रम वर्षभर राबवत असतेत्याचाच एक भाग म्हणून आजचा हा भारतीय संविधान दिन मोठ्या आनंद उत्सवात साजरा करण्यात आला.
प्रामुख्याने उपस्थित असलेल्या श्री गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रा . डॉ . मनीषा यादव यांनी संविधान ही आपली जीवनपद्धती या विषयावर आपल्या व्याख्यानातुन उपस्थित सर्वांना सर्वत्र संविधान विषयक अचूक माहिती विशद केली सिद्धार्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना संजय तायडे व सौ . जयश्री शहाकर यांनी पण आपले विचार व्यक्त करत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच २६ / ११ मध्ये शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना आपले प्राण गमावणाऱ्या शूर वीरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली तर सदर कार्यक्रमात श्री. गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्रा.भारती बाजड प्रा . एस . यु . इंगोले प्रा राजकन्या खनखने यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.
तर सिद्धार्थ विद्यालयाचे गोपीचंद गजभिये हरिभाऊ पवार सुनिल चव्हान संतोषानंद खडे विलास नागदिवे प्रशिश इंगळे उज्वल सोनवणे सिद्धार्थ शिरसाट दीपा खंडारे तथा सामाजिक कार्यकर्ते आखाराम जी भोरखडे गौतम खंडारे यांची प्रामुख्याने उपस्थित होते तर गजानन चव्हाण विलास वानखडे जय खंडारे मोहम्मद इम्रान भाई श्याम वाघ ऋषिकेश वाघमारे मयुर वाकपांजर .यांनी कार्यक्रम यशस्वी करीता सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली राहुल तायडे तर आभार जानवी रामनाथ यादव यांनी मानले.