आ.केराम व माजी आ.नाईक यांच्या लढतीची शेवटपर्यंत उत्सुकता शिगेला...!

 


प्रदीप नाईक यांचे कार्यकर्त्यांनीच काम करून टाकल्याची चर्चा...


किनवट , अनिल बंगाळे - किनवट माहूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत आ. भिमराव केराम व माजी आ. प्रदीप नाईक या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यात थेट लढत राहीली.  आ.भिमराव केराम मतदार संघात फिरलेच नाहीत, कार्यकर्त्यांशी संपर्क नाही. हा आरोप प्रदीप नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला पण भाजप व भिमराव केराम यांनी विरोधकाचा हा दावा फोल ठरवत मतदार संघातील चौफेर विकास केल्याचे सांगत सर्वजाती धर्माची अन् लाडक्या बहीणींनी दिलेला आशीर्वाद म्हणून मला पुन्हा संधी दिल्याचे विकास पुरुष असल्याचे सिद्ध केले. एकुण मतदान २०२३६० एवढे झाले. त्यापैकी भाजपाचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी ९२,८५६ मते घेतली तर पराभुत रा.कॉ. (शरद पवार गट) चे उमेदवार प्रदीप नाईक यांनी ८७,२२० मते घेतली ५६३६ मतांनी नाईक यांचा पराभव आ. केराम यांनी केला. आमदार भिमराव केराम यांच्या निवडणुकी दरम्यान त्यांच्या विजयात लाडकी बहीण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा प्रकल्पातून ९२ गावांना वगळण्याची केलेली घोषणा तर बोधडी येथे आ. पंकजा मुंडे यांची झालेली सभा ज्यामध्ये मुंडे यांनी भावनिक आवाहन केले.  पहिल्या ते १७ व्या फेरीपर्यंत प्रदीप नाईक आघाडी घेऊन होते, परंतु किनवट शहर, गोकुंदा सर्कल, बोधडी सुरु झाल्यापासून त्यांची आघाडी कमी होऊन १८ फेरी नंतर केराम यांनी नाईक यांच्यावर १३७९ मतांची आघाडी घेतली आणि ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहीली. ज्यामध्ये ५६३६ मतांनी नाईक यांचा पराभव आ. केराम यांनी केला. त्यात बदललेले निवडणूक चिन्ह तुतारी मिळाल्याने मिळते जुळते पिपाणी या चिन्हाला प्रदीप नाईक यांचे मते गेल्याने नुकसान झाल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला सर्व समाजातील मराठा,आदिवासी,  महादेव कोळी, धनगर, हटकर, कोमटी, ब्राम्हण, हिंदी भाषीक, मथुरा,  वंजारी, वेलमी, मुस्लिम बौद्ध मातंग बांधव महिला, मन्नेरवारलू, इतकेच नाही तर अनेक ठिकाणी  बंजारा समाजाची मते मिळाल्याने हा विजय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भिस्त हि बंजारा, मुस्लिम या समाजावर होती. प्रदीप नाईक यांना त्यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी फुगीर लीड मिळत असल्याचे दाखवून गाफील ठेवले असल्याचे बोलल्या जात आहे व विविध सर्कलमध्ये कार्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे प्रदीप नाईकाची लीड कशी कमी झाली याबाबतचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

संभ्रम निर्माण करणारे सर्वात महत्वाचे घटक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी निशाणी होती. तुतारी वाजविणारा माणूस या निशानी प्रमाणे रिपब्लिकन पक्ष खो. री.पा. या पक्षाचे उमेदवार अशोक ढोले यांची निशानी पिपाणी होती.  ज्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला. त्यांचे ५३११ मते या निशानीला मिळाले. अपक्ष उमेदवार सचिन नाईक यांनी ५५११ मते व प्रा. विजय खुपसे यांनी १६०० मते प्राप्त केली या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे समिकरण बिघडले आणि आमदार भीमराव केराम यांनी किनवट विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळला.







Post a Comment

Previous Post Next Post