गावाकडची बातमी| Kolhapur | केर्ले शाळा मुख्याध्यापक ; शिक्षिका निलंबित

 


गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू प्रकरण
...!


कोल्हापूर (Kolhapur) : करवीर तालुक्यातील "केर्ले" येथील जिल्हा परिषद शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्याध्यापक कृष्णात माने व अध्यापिका वंदना माने यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी निलंबित केले.




या दुर्घटनेत स्वरूप माने या सहावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. जि.प.ने घटनेचा वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना गट विकास अधिकार्‍यांना दिल्या होत्या. अहवाल सादर केल्यानंतर मुख्याध्यापक कृष्णात माने व अध्यापिका वंदना माने यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले.

सहा महिन्यांपासून लोखंडी गेट नादुरुस्त होते. ते धोकादायक स्थितीत ठेवल्यामुळे विद्यार्थी सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत असल्याचे मुख्याध्यापक माने यांना दिलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात कागल पंचायत समितीमध्ये बदली केली आहे. स्वरूपला दोरी सोडून अध्यापिका माने यांनी गेट बाजूला सरकविण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनाही जबाबदार धरून सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांना शिरोळ पंचायत समिती मुख्यालय निश्चित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post