कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातला कसूर भोवला ; चौघांचे निलंबन, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आदेश

 







मूर्तिजापूर - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री आपल्या कर्तव्यावर नसल्याचे चौकशीदरम्यान निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आल्याने मंडळ अधिकारी व तलाठी अशा दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी निर्गमित केला. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सर्व जबाबदार यंत्रणांनी काम करावे, निवडणूक कर्तव्यात एकही कसूर खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्रमांक १ चे पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी महादेव सरप आणि पथकातील सदस्य जीवन राठोड यांनी कर्तव्यामध्ये निलंबन कालावधीत दोघांचेही मुख्यालय अकोला तहसील कार्यालय राहील. कार्यालय प्रमुखाच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्यालयी राहण्यास कसूर केल्यास कार्यवाही करण्यात येईल.निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहे; मात्र माना पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचारी पल्लवी तायडे यांनी गृह मतदानादरम्यान वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश पारीत केले.हलगर्जीपणा, कसूर केला व सचोटी राखली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नियम ३ मधील तरतुदीचा भंग झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.पथकप्रमुख मंडळ अधिकारी सरप हे निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर राहत नसल्याबाबत वृत्त 'लोकमत' मध्ये प्रकाशित झाले होते. त्यावरून त्यांना मूर्तिजापूर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली व खुलासा मागवून चौकशीही करण्यात आली. सरप हे निर्धारित वेळेत नसल्याचे दिसून आले. त्यांनी स्वतः उपस्थित राहण्यासह पथकाच्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवणे व दिलेल्या कालावधीत गस्त घालणे अपेक्षित होते. तथापि, ते रात्री १ ते ३ दरम्यान अनुपस्थित होते.त्याचप्रमाणे, तलाठी जीवन राठोड हेही रात्री १२:३० वाजता नंतर पथकासोबत नव्हते. जर पथकप्रमुख गैरहजर असतील तर त्याबाबत सदस्याने आचारसंहिता नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कल्पना देणे आवश्यक होते. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कर्तव्य न पाळल्यामुळे सरप व राठोड या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. तसेच मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी हेमंत गर्जे हे सुद्धा निलंबित करण्यात आल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post