ती केलेली मरम्मत दोष दायित्व कालावधीत अन् काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीकडून सा. बां. विभागास धरले वेठीस...!

 



 बदनाम करण्याच्या कट कारस्थानाचा पत्रकार परिषदेत उपविभागीय अभियंता यांनी केला खुलासा








मूर्तिजापूर - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र राजकीय पक्षांकडून सुरु आहे.अश्यातच एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेकरिता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मूर्तिजापूरात येणार असल्याने संबंधित कंत्राटदाराने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने सदर मार्गाची रस्ता दोष दाईत्व कालावधीत असल्याने मरम्मत करण्यात आली. परंतु शहरातील काही प्रसार माध्यमांच्या विघ्नसंतोषी पत्रकाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माथ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला.



 सदर पत्रकारांनी संबंधित विभागाची कुठल्याही प्रकारचा संपर्क, माहिती अथवा विचारणा न करता आर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम करण्याचे कटकारस्थान केल्या गेल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश नवलकार यांनी माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post