मूर्तिजापूर - येथील कोकणवाडीत रहाणारे कुटुंब रविवारी बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोराने घराचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह ६० हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची तक्रार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार सुधाकर रंगराव टिपरे ,वय ६५ रा. मूर्तिजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे उनखेड येथे कोकणवाडी येथे घर असून कधी उनखेड तर कधी येथील कोकणवाडी येथे असलेल्या घराचे कुलूप उघडले असल्याचे दिसताच त्यानी तत्काळ घरात जावून पाहणी केली असता, घरातील कपाटात ठेवलेले रोख १५ हजार दिसले नसल्याने दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाट पाहिले असता त्यातील समान अस्तव्यस्त दिसल्याने त्यात ठेवण्यात आलेली सोन्याची शॉट पोत दोन व कानाची सोन्याची वेल, ३९ हजार रुपये, चांदीचे भांडे अंदाज किंमत पाच हजार, असा एकूण ५९ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघडकीस आले.