मूर्तिजापुरात वाईन मार्ट फोडले अन् मुद्देमाल लंपास...!
मूर्तिजापूर - येथील स्टेशन विभागातील नेभनाणी कॉम्प्लेक्समधील महाजन वाईन मार्टचे शटर तोडून चोरांनी २७ हजार ५०० रुपयांचे मद्य व रोख ४० हजार, असे एकूण ६७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक २७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार महाजन वाईन मार्टचे मालक अमन रवींद्र महाजन ,वय ३० रा. कोकण वाडी, मूर्तिजापूर यांचे महाजन वाईन मार्ट हे मद्य विक्रीचे दुकान येथील स्टेशन विभागातील नेभनाणी कॉप्लेक्समध्ये आहे. त्यांच्या बाजूचे दुकान मालक दीपक चंदावाणी यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तुटलेले असल्याबाबत त्यांना माहिती दिली. ते लगेच दुकानवर पोचले. दुकानाचे शटर मधातून दुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तुटलेल्या शटरचे कुलूप उघडून आत जाऊन पाहणी केली असता, गल्यात ठेवलेले रोख ४० हजार रुपये तसेच विविध कंपनीच्या विदेशी दारू २७ हजार ५०० रुपये, असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आमन महाजन यांनी येथील शहर पोलिस स्टेशन गाठून अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दिली.फिर्यादीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध ३१४, (१), ३०५ (१) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.