आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांकडून कार्यकर्त्याचां मेळावा घेण्यावर भर...

 



विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 


किनवट - जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना राजकीय वर्तुळातून वेग वाढायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांच्या इच्छूक उमेदवारांनी आपापले मतदारसंघ सुरक्षीत राहावेत यासाठी कार्यकर्त्यांचा मेळ जमवून जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिल्याचे पहायला मिळते. यावेळच्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार किनवट विधानसभा मतदारसंघात फक्त गोकुंदा आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेले इस्लापूर हे दोनच जिल्हा परिषद गटं अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत. जिल्ह्यात बारा जाग्यावरचा आरक्षण कोठा आहे. अनुसूचित जमातीसाठी मात्र जिल्ह्यात सहा गटाचा कोठा असलातरी या मतदारसंघात सद्यातरी ते आरक्षणाचा कोठा नसल्याने इत्तरांसाठी सुटलेले असतील असे सूत्र सांगताहेत. उर्वरीत गटांपैकी कांही गटांवर वेगवेगळे आरक्षण असेल. बोधडी कदाचित सर्वसाधारणसाठी असल्यास मान्यवर इच्छुकांची तुंबळगर्दी होण्याची शक्यता आहे.

      गोकुंदा जिल्हा परिषद गटात अनुसूचित जातीची ४६०० लोकसंख्या असून इस्लापूर गटात ४००० हजार लोकसंख्या असल्याने ते दुसर्‍या क्रमांकावर येत आहे. उबाठा सरकारच्या काळात किनवट विधानसभा मतदारसंघातील किनवट तालुक्यातील मोहपूर आणि माहूर तालुक्यातील लखमापूर हे दोन नविन जिल्हा परिषद गट निर्माण केले होते. परंतू उबाठा सरकारचा अस्त होऊन शिंदे सरकार आल्यानंतर मात्र त्यांनी उबाठा सरकारने वाढवलेले मोहपूर आणि लखमापूर ही दोन्ही गटं रद्दबातल केली असल्याने गोकुंदा आणि इस्लापूर हे दोनच अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. उबाठा सरकारने नविन निर्माण केलेले मोहपूर आणि लखमापूर गटं अस्तित्वात असते तर राखीव गटांची सख्या चारवर गेलेली होती. त्यात मोहपूर आणि मांडवीचा समावेश करण्यात आला होता. आज ती परिस्थिती राहिली नाही.

     गोकुंदा जिल्हा परिषद गटातून शिंदेंच्या शिवसेनेचे मारोती सुंकलवाड, सुरेश घुमडवार, उबाठा शिवसेनेचे अतूल दर्शनवाड, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्योतिबा गोणारकर, तर माकपाचे जनार्धन काळे, वंचित बहूजन आघाडीचे निखील वाघमारे, भाजपाकडून सिद्धार्थ वाघमारे, उमेश पिल्लेवार, बबलू वाघमारे यांच्यासह अन्यजन इच्छूक असल्याची चर्चा आहे.

 तर इस्लापूर गटातून शिंदेंच्या शिवसेनेकडून शिलवंत कांबळेंसह अन्य एकजन इच्छूक असल्याचे तालुका प्रमूख बालाजी मुरकुटेंनी सांगितले आहे. भीमराव नरवाडे सुद्धा इच्छूक असल्याचे समजते. गोकुंदा जि.प.गट हा सर्वसाधारणसाठी सुटला असतातर शिवसेनेकडून बालाजी मुरकुटे, भाजपाकडून संदीप केंद्रे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रविण मॅकलवार, प्रकाश राठोड हे इच्छुकांच्या यादीत झळकले असते. इस्लापूर आणि गोकुंदा गटं अनुसूचित जातीसाठी राखीव असलेतरी महिलांसाठी कोणता गट सुटेल यावर पुरुष इच्छूक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post