अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी जेरबंद
मूर्तिजापूर - एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फिर्यादीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अटक करून विविध गुन्हे दाखल केले.
प्राप्त माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिनांक ११ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. फिर्यादीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ तपास चालू केला. पोलिसांकडून पसार आरोपीचा शोध घेत असता, दिनांक २६ नोव्हेंबर रोजीच्या रात्री यामध्ये पीडितेने दिलेल्या जबानी माहितीवरून ती सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर येताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तायडे, अनिल पवार यांनी तात्काळ आरोपी विशाल अतिश राऊत वय २१ रा. पिंपरी मोडक, ह.मु. ब्राह्मणवाडा, ता. कारंजा, जि. वाशीम याला अटक करून त्यांच्याविरुद्ध कलम १३४ (२), ६४ (२) (एम) बीएनएस सहकलम ३, ४, ५ (जे), (२) ६, ९ (जे) (ब) पॉक्सो नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहेत.