श्रीकांत राऊत यवतमाळ, गावाकडची बातमी
महागांव :- गुरुवर्य तानाजी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा, निजधाम आश्रम मुडाणा ते माहूरगड दिनांक 17 11 24 ला आयोजित करण्यात आला होता या पायी दिंडीमध्ये जवळपास 300 ते 400 नागरिकांचा समावेश होता. पडत वाघनाथ,पिपरी, आंबोडा,लेवा, महागाव, आमणी, मुडाणा, दारेगाव,वडद,पिपळगाव येथील भाविकांचा समावेश होता. दरवर्षी निजधाम आश्रमातून आषाढी एकादशीला मुडाणा ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते व कार्तिकी एकादशीला मुडाणा ते माहूर पायी दिंडीचे आयोजन गुरुवर्य तानाजी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते आयोजन करण्यात येते. माहूर येथे जवळपास 700 ते 800 जणांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन उर्वरित तानाजी बापू यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाने या पायी दिंडीची सांगता झाली..