2024 चा कृषिथॉन नाडा आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार सत्यम कृषी सेवा केंद्र हरसुलचे संचालक योगेश दामू कसबे यांना प्रदान

 



 गावाकडची बातमी तालुका प्रतिनिधी आनंद मगर




2024 चा आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार  खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते योगेश कसबे यांना प्रदान करण्यात आला .यावेळी उपस्थितीत दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे सर सह इतर पदाधिकारी उपस्थित होते नासिक नाडाचे पदाधिकारी सह त्रंबकेश्वर ऍग्रो डीलरचे अध्यक्ष गोकुळ महाले, ज्ञानदा कृषी सेवा केंद्राचे संचालक आनंद मगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

यावेळी माननीय राजाभाऊ वाजे यांनी शेतमालाच्या मार्केटिंग मध्ये शेतकरी मागे पडतो. त्यामुळे कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना मार्केटिंग मध्ये सल्ला द्यावा. त्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे राहावे. असे प्रतिपादन राजाभाऊ वाजे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post