मूर्तिजापूरात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

 



उमेदवारांच्या मनात धाकधूक ; उमेदवारांचे देवाकडे साकडे





मूर्तिजापूर - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघांत २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून, शनिवार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 त्या अनुषंगाने मूर्तिजापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय

अधिकारी कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आलेली मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पांचही मतदारसंघांत २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून,रिगणातील ७० उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले आहे. २३ नोव्हेंबर रोजी पाचही मतदारसंघांत मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने पाचही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारीकार्यालयांमार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक व संबंधित कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून एकुण २८ फेऱ्या होणार आहेत, टपाली मतपत्रिकांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी सात टेबलवर होणार आहे. तर मूर्तिजापूर  मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार यांच्या निदर्शनात शासकीय धान्य गोदाम क्र. ५, तहसील कार्यालय परिसर, मूर्तिजापूर येथे होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post