प्रचार सभेला प्रचंड गर्दी ; सर्वांनी केला विजयी करण्याचा संकल्प...!
मूर्तिजापूर - विधानसभा मतदारसंघ हा गेली पंधरा वर्षापासून अनुसुचित जाती राखीव असून प्रस्थापित पक्षाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत त्यांनी स्वतःचा विकास केला आहे आणि मतदार संघ भकास करून ठेवला आहे यावर विकासाचा अभाव भरून काढायचा असेल तर डॉ.सुगत वाघमारे हे सक्षम उमेदवार असून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन वंचीत बहुजन आघाडीचे युवा नेते तथा युवकांचे आशास्थान सुजात आंबेडकर यांनी डॉ सुगत वाघमारे यांच्या आठवडी बाजार मूर्तिजापूर येथे आयोजित प्रचार सभेत केले.
प्रचार प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात वंचीत बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की जेव्हा मुस्लिम समाजावर या भाजप सरकारने ऐणार सीएएचा कायदा लागू केला तेव्हा संपूर्ण भारतभर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी या कायद्याचा विरोध करून मुस्लिम समाजाला साथ दिली आहे ,आज ही मुस्लिम समाज बाळासाहेबांच्या सोबत असताना विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे .
होऊ घातलेल्या २० नोव्हेंबर रोजी आपली ताकद दाखवून आंबेडकर वाद्यांनी दोन दिवसात आपली भूमिका घेऊन स्वतःला बाळासाहेब आंबेडकर समजून ही जंग जिंकून आणण्याचे आवाहन केले आहे.
महाविकास आघाडी दिलेला उमेदवाराला गुलामगिरीच करावी लागणार आहे असा टोला सुद्धा सुजात आंबेडकर यांनी दिला आर्थिक सक्षम होण्यासाठी आज मतदारसंघाचे युवकांना गरज आहे परंतु आपण जाती धर्माच्या नावाने वेगवेगळी वस्तूकडेच लक्ष देतो याला आपण बळी न पडता आपला विकास आपल्या गावाचा आपल्या देशाचा विकास कसा होईल याकडे जर लक्ष दिले दिले पाहिजे वंचित बहुजन आघाडी बेरोजगार युवकांसाठी व महिला बचत गटासाठी मोठे मोठे उद्योग निर्माण करणार जेणेकरून आपली आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा येईल मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामीण भागात जागोजागी चांगले आरोग्य केंद्र ,पाण्याची भीषण समस्या निकाल काढण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावा असेही आव्हान डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले.
यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि सर्वांनी डॉ.सुगत वाघमारे यांना निवडून देण्याचा संकल्प केला आहे.
Tags : #akolanews, #मतदार #नागरिक मराठी बातमी #GavakadachiBatmi, #Maharashtra #India #murtizapurnews #aknews #डॉ.सुगत वाघमारे, #बातमीराजकीय, #ncp #बातमीमहाराष्ट्राची, #वंचित_बहुजन_आघाडी, #सुजात आंबेडकर, #प्रकाश आंबेडकर, #vba #Congress #bjp #बसपा #राजकीय वाटचाल #शरदपवार #राजकीय, #Devendrafadanvis #अजितपवार #एकनाथ_शिंदे #NarendraModi #सुप्रिया सुळे #बच्चू कडू #राजकारण #विधानसभा निवडणुक #गावाकडची बातमी