मुर्तिजापूर , गाव सहेली टीम - जाणून-बुजून शरद पवारांनी मुर्तीजापुर मतदार संघात अनुसूचित जातीतील बौद्ध उमेदवारादिला, त्यामुळे भूलथापाला बळी न पडता आंबेडकर वाद्यांना ही जंग जिंकायची असल्याचे प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी डॉक्टर स्वागत वाघमारे यांच्या प्रचार दरम्यान केले.
सुजाता आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की जेव्हा मुस्लिम समाजावर या भाजप सरकारने येणार सीएए चा कायदा लागू केला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी या कायद्याचा विरोध करून मुस्लिम समाजाला साथ दिली आहे ,आज ही मुस्लिम समाज बाळासाहेब सोबत असताना विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे .
होऊ घातलेल्या 20 नोव्हेंबर रोजी आपली ताकद दाखवून आंबेडकर वाद्यांनी दोन दिवसात आपली भूमिका घेऊन स्वतःला बाळासाहेब आंबेडकर समजून ही जंक जिंकून आणण्याचे आव्हान केले आहे.
महाविकास आघाडी दिलेला उमेदवाराला गुलामगिरीच करावी लागणार आहे असा टोला सुद्धा सुजात आंबेडकर यांनी दिला.
आर्थिक सक्षम होण्यासाठी आज मुर्तीजापुर मतदारसंघाचे युवकांना गरज आहे परंतु आपण जाती धर्माच्या नावाने वेगवेगळी वस्तूकडेच लक्ष देतो याला आपण बळी न पडता आपला विकास आपल्या गावाचा आपल्या देशाचा विकास कसा होईल याकडे जर लक्ष दिले दिले पाहिजे वंचित बहुजन आघाडी बेरोजगार युवकांसाठी व महिला बचत गटासाठी मोठे मोठे उद्योग निर्माण करणार जेणेकरून आपली आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा येईल मुर्तीजापुर मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामीण जागोजागी चांगले आरोग्य केंद्र ,पाण्याची भीषण समस्या निकाल काढण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावा असेही आव्हान डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले.