मूर्तिजापूर: 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेल्या भारतीय राज्यघटनेच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर सय्यद अहमद खान नगर परिषद शाळेत संविधान दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नासिर हुसेन खान व सर्व शिक्षा यांनी संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व राज्यघटनेतील महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला.
संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय राज्यघटनेत संघराज्य, एकात्मक आणि संसदीय स्वरूपाची वैशिष्ट्ये आहेत. वेळोवेळी योग्य तरतुदींची गरज भागवण्यासाठी घटनादुरुस्ती प्रक्रिया करण्याची तरतूदही संविधानात आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नासिर हुसेन खान यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची वैशिष्ट्ये सांगितली. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक सय्यद बशारत अली, फरहीन फातिमा, मोहम्मद शाहबाज, शिक्षक नूरजहान मलिक, उमे सिद्दीका आणि शिक्षक वसीम आसिफ खान उपस्थित होते.