वाटचालीतील सातत्यानेच संस्था- संघटना मोठ्या होत असतात ! ---- डॉ.गजानन नारे

 



लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३९ विचारमंथन मेळाव्यात नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन..!



शहिद,अत्याचारग्रस्त भगिनी,शेतकरी व अपघात तथा आपत्ती बळींना श्रध्दांजली


 नारी ललकार दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन


 अकोला- सामाजिक कार्यातील वाटचाल ही अभिषेकातील थेंबाप्रमाणे सातत्यपूर्ण असावी.ध्येयाने झपाटलेल्या या कृतिशील विचारांनीच संस्था- संघटना ह्या मोठ्या होत असतात.त्यासाठी योग्य लोकांची निवड आवश्यक असून ती करता आली पाहिजे.या दिशेनेच लोकस्वातंत्र्यची वाटचाल आहे.असे उद्बोधक प्रतिपादन प्रभात चॅरिटेबल सोसायटी व प्रभात किडस् स्कूलचे संस्थापक- संचालक डॉ.गजानन नारे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा सलग ३९ वा मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जठारपेठ चौकातील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.याप्रसंगी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. महाराष्ट्र शासनाचा आपली शाळा- सुंदर शाळा हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रभात किडस् ला मिळाल्याबध्दल त्यांचा स्मृतीचिन्ह,व सौ.नारे यांना सन्मानपत्र व शाल, पुष्पगुच्छ तथा संविधान पुस्तक देऊन त्यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सौ‌ वंदनाताई नारे ह्या प्रमुख अतिथी म्हणून तर दुरदर्शन वृत्तप्रतिनिधी व पिटीआय ब्यूरो चिफ विशाल बोरे,लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,राष्ट्रीय मार्गदर्शक पुष्पराज गावंडे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. अकोला जिल्ह्यातील रणधीर सावरकर,हरिष पिंपळे,नितीनबाप्पू देशमुख,साजीदखान पठाण, प्रकाश भारसाकळे या नवनिर्वाचित आमदारांचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी प्रास्ताविकातून अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.


       यावेळी सर्वप्रथम नियमित शिरस्त्याप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांना वंदन- अभिवादन करण्यात आले‌.देशातील शहिद जवान, अत्त्याचारग्रस्त भगिनी,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, आपत्ती व अपघातातील बळींना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संजय एम.देशमुख यांनी प्रास्ताविकातून उपक्रमांची माहिती दिली. आपल्या भाषणातून पुढे बोलतांना नारे यांनी सन्मान हे दिंडीतील प्रसादाप्रमाणे असून उर्जा पुरवित असल्याचे सांगून वाचन प्रभात या फिरत्या वाचनालय उपक्रमासाठी शासन पुरस्काराच्या रू ५१ लाख निधीचा विनियोग केल्याची माहिती दिली.विशाल बोरे यांनीही आपण काय मिळवतो यापेक्षा ईतरांना काय देऊ शकतो हा विचार असावा. महापुरूषांच्या प्रेरणादायी अशाच विचारांनी चालणाऱ्या लोकस्वातंत्र्यकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं सांगत संघटनेच्या उपक्रमशील सातत्यपूर्ण वाटचालीचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त केल्या.राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख व पुष्पराज गावंडे यांनीही मनोगते व्यक्त केली.जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांच्या नारी ललकार दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आली.त्यांनी अकोला जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान केली.


       या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख,अंबादास तल्हार, अॕड‌‌.राजेश जाधव,अॕड.नितीन धुत,डॉ.विनय दांदळे, के.व्ही.देशमुख, सुरेश पाचकवडे,प्रा.मोहन काळे,संजय कृ‌.देशमुख,संदिप देशमुख,पंजाबराव वर,विजयराव बाहकर, डॉ‌.अशोक सिरसाट, वसंतराव देशमुख, धारेराव देशमुख, श्रीपाद दशरथ, दिपक शर्मा,सतिश मा‌‌.देशमुख,मनोहर मोहोड,अशोककुमार पंड्या, अनंतराव देशमुख,अॕड संकेत देशमुख, प्रा‌.सुरेश कुलकर्णी,के.एम.देशमुख,गौरव देशमुख,देवीदास घोरळ,रविन्द्र देशमुख,विजय देशमुख,गजानन मुऱ्हे,बुधन गाडेकर, योगेश सिरसाट,विजय देशमुख, गणेश देशमुख,अजय वानखडे, अर्जूनराव घुगे, पि.एन जामोदे, पंकज देशमुख व ईतर पत्रकार सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन विजयराव बाहकर यांनी तर आभारप्रदर्शन पंजाबराव वर यांनी केले.



Post a Comment

Previous Post Next Post