सम्राट सुरवाडे यांना प्रचारात वाढता प्रतिसाद अन् इतरांचे वाढले टेन्शन...!
मूर्तिजापूर - महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे अश्यातच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ ०३२ मध्ये एआयएमआयएम या पक्षाचे अधिकृत उमेदवार सम्राट सुरवाडे यांना प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता इतरांचे टेन्शन वाढले असल्याचे मतदार सांगत असून चर्चेला उधाण आले आहे.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ ०३२ यामध्ये वेगवेगळे राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून काही अपक्षांचा सुद्धा समावेश आहे आपापल्या परीने प्रचारात चांगला जोर धरत आहेत येत्या काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावर असल्या तरी या सर्व उमेदवारांपेक्षा एआयएमआयएम या पक्षाचे अधिकृत उमेदवार सम्राट सुरवाडे यांना मतदारांमधून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता इतरांचे धाबे दणाणले असून टेन्शन वाढविले असल्याचे मतदार सांगत आहेत.
सम्राट सुरवाडे यांचा जाहीरनामा हा इतरांपेक्षा वेगळा असल्या कारणाने मतदारांमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.अकोला जिल्ह्यात रुग्णसेवक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत इतरही अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे हा मतदार राजांच्या प्रतिसाद मिळत असल्याचे सम्राट सुरवाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आणि सदरच्या प्रतिसादाच्या भरोश्यावर विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास आहे असेही बोलून दाखविले.
Tags: #GavakadachiBatmi #बातमीमराठी #aap #Google #सम्राट सुरवाडे #मूर्तिजापूर #अकोला #वंचित #शिवसेना #उध्दव ठाकरे #राजठाकरे #एकनाथ_शिंदे #अजितपवार #शरदपवार #सुप्रिया_सुळे #देवेंद्रफडणवीस #अमितशहा #नरेंद्रमोदी #भारत #वंचित_बहुजन_आघाडी #जनतादल #जनता #गावाचाविकास #आम_आदमी_पार्टी #महिला #भाजपा #कांग्रेस #बसपा #बहुजन_मुक्ती_पार्टी #राजकीयबातमी #राष्ट्रवादी_काँग्रेस #नागरिक #मतदार #NCP #Congress #vba #स्वच्छ भारत #विधानसभा_निवडणूक #गावाकडची बातमी #महायुती #Maharashtra #murtizapurnews #India #AK #akolanews