विदर्भ कोष्टी हितकारणी मंडळ,नागपूरच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा उत्साहात संपन्न

 




नागपूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नृत्य,खेळ,संगीत,खाण्याची रेलचेल असे उत्साही व आनंदी वातावरण असते.याच कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून विदर्भ कोष्टी हितकारणी मंडळ,नागपूरच्या वतीने नुकताच कमल सेलिब्रेशन,बेसा-पिवळा,नागपूर या ठीकाणी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला.कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवामध्ये समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरोडे,अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सतिश दाभाडे,परिषदेचे कोषाध्यक्ष विष्णू कुटे उपस्थित होते.विदर्भ कोष्टी हितकारणी मंडळाचे अध्यक्ष गजानन राव धोपे आणि परिषदेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र जुमळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमांमध्ये नागपूर मधील जवळपास८०समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

     योगेश उकंडे आणि संजय किनीकर यांनी याप्रसंगी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले होते.ब-याच समाज बांधवांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सुध्दा सादर केली.हावजी गेम,संगीत खुर्ची,नृत्य इत्यादी विविध प्रकारच्या खेळांचा मनमुराद आनंद घेतला.यावेळी उपस्थित समाज बांधवांनी विविध प्रकारच्या भजांचा,अल्बोंड्याचा,शेंगा,छोले भटुरे,पुलाव,स्वादिष्ट बर्फी,रसगुल्ले आणि सर्वात शेवटी मसालेदार दुधाचा मनसोक्त आनंद घेतला.नागपूर मध्ये ब-याच कालावधीनंतर कोजागिरी पौर्णिमा साजरी झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले.

     कोजागिरी पौर्णिमा यशस्वी करण्यासाठी योगेश उकंडे,राजेंद्र पाटील,संजय किनीकर,स्वानंद देशकर,कुणाल गोरख इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.सहभागी सर्व समाज बांधवांचे,प्रमुख पाहुण्याचे कमल सेलिब्रेशन च्या मुख्य संचालिका सुनिता दाभाडे,कुमारी श्यामली दाभाडे,सायली आदित्य जांभेकर आणि सर्व स्टाफचे आभार विदर्भ कोष्टी हितकारणी मंडळाचे सचिव प्रदीप आगे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post