एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन


गावाकडची बातमी तालुका प्रतिनिधी आनंद मगर 


नाशिक, त्र्यंबकेश्वर : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हरसुल बीट ठाणापाडा -१_अंतर्गत चिरापाली येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला बालकल्याणचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी  प्रताप पाटील व बालविकास प्रकल्प अधिकारी  मंगला भोये व ग्राम विकास अधिकारी ,यांच्या सर्व अंगणवाडी शिक्षिका मदतनीस, आशाताई आणि सोबत पर्यवेक्षिका भगिनी व ग्रामस्थ व महिला बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वप्रथम तारपा व संबळ वाद्यावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आणि यासोबत आयसीडीएस च्या केक कटिंग करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 



सदर कार्यक्रमाला ग्रामस्थांचा महिलांचा व सर्वांचा भरभरून प्रतिसाद लाभला . पालक मेळाव्यात मुलांना खेळणी नको तर खेळ हवा याबाबत विविध स्टॉल लावण्यात आले होते.त्यामधून बालकांचा सर्वांगीण विकास होईल.कार्यक्रमाचे संचालन अलका मालोदे यांनी तर आभार प्रदर्शन वनिता राऊत यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post