नवा इतिहास घडविण्या करिता स्मारके प्रवृत्त करतात : जयसिंग वाघ

 


गावाकडची बातमी विशेष प्रतिनिधी गणेश पाटील 


चाळीसगाव :- आपला देश स्मारकांचा देश म्हणून ओळखला जातो , सर्वाधिक स्मारकांची निर्मिती सम्राट अशोक यांनी केलेली आहे .प्राचीन स्मारकांचे अवशेष आजही चांगल्या अवस्थेत आपणास पाहावयास मिळतात . सर्व स्मारके ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याने ते आम्हाला नवा इतिहास घडविण्या करिता प्रवृत्त करत आहेत असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

        जन आंदोलन खान्देश विभाग तर्फे चाळीसगाव येथे ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्मिती का? आणि कशा साठी ' या विषयावर आयोजित जाहीर व्याख्यान प्रसंगी भाषण करतांना वाघ बोलत होते.

          जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की, २३ ऑक्टोबर १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाळीसगावला आले असता तेंव्हाच्या अस्पृश्य नेत्यांनी बाबासाहेबांना स्टेशन पासून कार्यक्रमा ठिकाणी टांग्यातूनच न्यायचे असा निर्धार केला पण त्यांना कोणी टांगाच देत नव्हते , अखेर एका टांगा मालकाने ' टांगा देणार पण तुम्हीच तो चालवा , मी चालविणार नाही ' असे सांगून दिला . टांगा कुणालाच चालविता येत नसतानाही कोणीतरी तो चालविला , अखेर टांगा पलटी झाला . यात बाबासाहेबांना मार बसला , त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले गेले व त्यांना दोन महिने अंथरुणाला खिळून रहावे लागले . त्या नंतर ते काठीच्या आधारानेच चालू लागले . ही घटना कोण्या महापुरुषाच्या जीवनात घडू नये असा संदेश हे स्मारक नेहमीच देत राहील असेही वाघ यांनी सांगितले .

           जन आंदोलन खान्देश विभाग चे मुख्य संयोजक तथा आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. गौतम निकम यांनी बाबासाहेबांच्या चाळीसगाव भेटीचा वृत्तान्त तसेच सदर जागा शासनाने अधिग्रहित करण्या बाबत दिलेल्या लढ्या बाबत सविस्तर माहिती दिली . बाबासाहेब ज्या ठिकाणी पडले ती जागा शासनाने ताब्यात घेऊन तेथे राष्ट्रीय स्मारक उभे करावे अशी मागणी केली . सामंजस्याने सरकार हे काम करणार नसेल तर आम्ही या पुढं रस्त्यावरची लढाई लढू असेही सांगितले .

    प्रास्ताविक अमोल मोरे , सूत्रसंचालन ऍड. उमेश त्रिभवन तर आभार स्वप्नील जाधव यांनी केले . भारतीय बौद्ध महासभा चे मधुकर पुंडलिक पगारे यांनी मनअनोगत व्यक्त केले .सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जयसिंग वाघ यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले .

       कार्यक्रमास मधुकर पगारे , राजू खरात , प्रा. गौतम सदवरते , अशोक जाधव , आधार जाधव , किरण जाधव , अरुण अहिरे , प्रा. कल्पतेश देशमुख , प्रा. अनिल भावसार आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते हजर होतें..

Post a Comment

Previous Post Next Post