आचरा(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-धी आचरा पीपल्स असोशिएशन संचालित न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत वाचना प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.' मी वाचले,तुम्हीही वाचा'या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनही पार पडले.साटेलकर सर यांनी डाॅ.ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य विशद केले.मुख्याध्यापक जी.बी.परब सर यांनी वाचनाचे महत्व विशद केले.शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या.सुयश सद्गुरु साटेलकर(रडार सिस्टीम-प्रथम क्रमांक),कौशल माधवराव भोसले आणि विक्रम वसंत भूतकडे(रिजार्जेबल टेबल फॅन-द्वितीय क्रमांक),कुंदन धनजंय नाटेकर(स्मार्ट होम),आणि तेजस निलेश शेट्ये(ग्रास कटर)यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.शालेय समिती अध्यक्षा निलिमा सावंत,सदस्य राजन पांगे,अर्जुन बापार्डेकर,रघुनाथ पाटील यांच्या हस्ते बक्षिस समारंभ पार पडला.कदम मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
न्य इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत वाचना प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शन
byGavakadachi Batmi
-
0