फर्दापूर शिवारातील वाघुर नदी पात्रात गावठी हातभट्टीवर फर्दापूर पोलिसांनी मारला छापा

 



जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


छ.संभाजीनगर : फर्दापूर शिवारातील वाघूर नदी पात्रात गावठी हातभट्टीवर फर्दापूर पोलिसांनी सोमवार दि.२१ दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा टाकून ३६ हजार रुपयांचे दारू बनविण्याचे रसायन व दारू जप्त करून नष्ट करण्यात आले.यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेश कुमार कोल्हे व सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या पथकाने सोमवारी वाघूर नदी पात्रातील गावठी हातभट्टी बनविणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी ६ हजार रुपये किमतीचे १५ लिटर क्षमता असलेल्या पांढऱ्या रंगाच्या ४ कॅन व ३० हजार रुपये किमतीचे १५० लिटर क्षमता असलेल्या रसायनाच्या ४ टाक्या असा एकूण ३६ रुपये किमतीचे रसायन व दारू जप्त करून जागेवर नष्ट करण्यात आले.याप्रकरणी आरोपी गुलशन समशेर तडवी (वय.४१ रा.फर्दापूर ता. सोयगाव) याच्या विरोधात फर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





Post a Comment

Previous Post Next Post