चिंचोली झाडगाव येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मोठा झटका ; असंख्य महिला पुरुषांनी केला भाजपमध्ये प्रवेश

 




धामणगाव तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे- धामणगाव रेल्वे तालुक्यात झाडगाव चिंचोली येथील काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांनी व महिलांनी आपल्या लाडक्या कर्तव्यदक्ष आणि विकासाची गंगा आणणारे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वावर व त्यांच्या विकासावर कुठल्याही जातीभेद न करता त्यांनी जे विकासाचे वादळ निर्माण केले.


   तसेच त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ग्रामपंचायत सदस्य उज्वला पोटफोडे यांच्या नेतृत्वात लक्ष्मण तिरळे, अशोक पोटफोडे,रामेश्वर जाधव ,रणजीत पोटफोडे, संगीता तेलंगे ,अर्चना तेलंगे, माधुरी जाधव, माला तिरळे, इंदू तिरळे मनीष जानवी जाधव ,पूजा तेलंगे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये खुल्या प्रवेश केला.

    यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अर्चना रोटे( अडसड) अशोक वानखडे सदस्य संजय गांधी निराधार अध्यक्ष धामणगाव गजानन टेकवडे तालुका अध्यक्ष मनोज डहाके मनोज धांदे अशोक शर्मा गिरीश भुतळा वनिता राऊत नलिनी मेश्राम असे अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित संपन्न झाला.






Post a Comment

Previous Post Next Post