शक्ती प्रदर्शन करत अखेरच्या दिवशी मूर्तिजापूर मतदार संघात ३८ उमेदवारी अर्ज दाखल...!

 



मोठ्या प्रमाणात गर्दी वाहतुकीची कोंडी ; नागरिकांना त्रास 






मूर्तिजापूर - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अशातच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करत वेगवेगळ्या राजकीय पक्षासह अपक्षांनी अखेरच्या दिवशी ३२ उमेदवारांनी आपले ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.



          विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारासह अपक्षांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे दिनांक २९ ऑक्टोंबर ही नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असल्याकारणाने सर्वच पक्षाकडून आपापल्यापरीने शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांचे कडे दाखल करण्यात आले आहे यासह अपक्षांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.वेगवेगळ्या पक्षाकडून काही झालेली बंडखोरी आणि अपक्षांचे फॉर्म यामुळे सध्या तरी मतदारसंघाचे लढतीचे चित्र स्पष्ट नसले तरी दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खरे लढतीचे चित्र स्पष्ट होईलआजच्या एकंदरीत अर्जानुसार मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या तर्कवितर्कांना वाव पुठला असून पारावर चर्चा रंगत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.



     यावेळी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्तात शिस्तबद्ध पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले.

---------------------------------------------

 या उमेदवारांनी केले मूर्तिजापूर मतदारसंघात अर्ज दाखल 


 किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष),सम्राट डोंगरदिवे ( महाविकास आघाडी ) पंकज सावळे (अपक्ष), सिद्धार्थ डोंगरे (अपक्ष), सुनील वानखडे (अपक्ष), सचिन कोकणे (रिपाइं- ए), रवींद्र पंडित (अपक्ष), सुगत वाघमारे (वंबआघाडी दोन अर्ज), पुष्पाताई महादेवराव इंगळे (अपक्ष), अंकिता राजू शिंदे (अपक्ष), हरिश पिंपळे (भाजप दोन अर्ज), रवी राठी (अपक्ष दोन अर्ज), संतोष इंगळे (अपक्ष), राजकुमार नाचणे (अपक्ष दोन अर्ज), श्रावण खंडारे (पीपल्स पार्टी- डे.), दयाराम घोडे (अपक्ष), यशवंत इंगोले (अपक्ष), गोपाळराव कटाळे (अपक्ष), भाऊराव तायडे (अपक्ष), विनोद सदाफळे (अपक्ष), राजश्री खडसे (अपक्ष), अरूण गवई (अपक्ष), महेश घनगाव (अपक्ष), महादेव गवळे (अपक्ष), गजानन वजीरे (अपक्ष), सम्राट सुरवाडे (एमआयएम), भिकाजी अवचार (मनसे), वंदना वासनिक (रिपाइं – ए)




Post a Comment

Previous Post Next Post