गावाकडची बातमी गणेश पाटील
एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ.संभाजी राजे आर पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्याकडे दाखल करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघातील प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता याप्रसंगी डॉ.संभाजी राजे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विर एकलव्य यांच्या स्मारकांना पुष्प हार अर्पण करत अभिवादन करण्यात आले एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघात डॉ.संभाजीराजे आर पाटील यांनी अपक्ष म्हणून हजारोच्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या काही महिन्यापासून त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे त्यांचा उमेदवारी अर्ज एरंडोल या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केला गेला यावेळी एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघातील असंख्य मतदार हजर होते.
यात पुरुषांसोबत महिलांची संख्या लक्षणीय होती दरम्यान डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांना नक्कीच डोक्याला ताण होणार आहे तसेच सदर निवडणूक ही खूप रंगतदार होणार आहे.