शहरी आरोग्य केंद्र मसानगंज च्या वतीने प्रवीण नगर गुरुकुल शालेय विद्यार्थ्यांनी डेंग्यू ची काढली भव्य जनजागृती रॅली

 




अमरावती - अमरावती शहराचे सचिन कलंत्रे आयुक्त मनपा, डॉ. विशाल काळे आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा, डॉ. शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती , डॉ. रुपेश खडसे साथरोग अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली प्रवीण नगर येथे गुरुकुल शाळेत डॉ. अल्मास खान वैद्यकीय अधिकारी मसानगंज शहरी आरोग्य केंद्र यांनी डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया बद्दल माहिती व आरोग्य शिक्षण दिले. 




तसेच आजूबाजूच्या परिसरातुन शालेय विद्यार्थी यांनी हाता मध्ये कीटकजन्य व जलजन्य आजार बाबत माहिती फलक घेऊन रॅली काढण्यात आली. त्यावेळी डॉ स्नेहल पवार वैद्यकीय अधिकारी सौ. तायडे , ज्योती वानखडे पि. एच.एन, शशांक निवाने बहुउद्देशीय कर्मचारी ,शालू राठोड, संगीता आत्राम, समीक्षा जाधव, प्रतिभा चव्हाण आरोग्य सेविका , रोशन पाटील डास अळी तपासनी कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व सर्व आशा उपस्थित होत्या. सर्व जनतेनी सुद्धा ह्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला

Post a Comment

Previous Post Next Post