महाराष्ट्रात पहिल्यांदाच अश्या राजकीय गोंधळाची, संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गेल्या पांच वर्षात तर सर्वच राजकीय पक्षात उलथापालथ झाली, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पाडून मूळ पक्षातील आमदार, खासदारांनी वेगळा गट स्थापन करून मूळ पक्ष आमचाच आहे असे भासवून पक्षाचे नांव, चिन्ह यावर दावा केला.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या बरोबर पक्षांतर, आयाराम गयाराम,घरवापसी, स्वगृही आल्याचे जाहीर कार्यक्रम जोरात होत आहेत.
त्याच पक्षातील मंडळी एकमेका समोर लढणार आहेत.
पक्षांतर केलेल्यांना ताबडतोब आमदारकीची उमेदवारी मिळत आहे.
गद्दारी केलेले, पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी मिळत असेल तर सर्वच राजकीय पक्षाना मतदारांनी निर्वाणीचा इशारा दिला पाहिजे.
मतदारांना गृहीत समजून तुमचे उमेदवार लादत असाल तर आमचा कोणताही उमेदवारा वर विश्र्वासच राहिला नाही,एवढ राजकारण गढूळ झाले आहे,कोण कधी पक्ष बदलेल ,याची शाश्वती राहिली नाही.
एका कुटुंबातील दोन जण वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढत आहेत.
काका पुतण्या, नणंद भावजय, वडील मुलगी, एकाच घरात खासदार, आमदार, खासदारकीला पडले त्यांना आमदारकी अश्या विचित्र तडजोडी करुन निवडणूका होत आहेत.
त्यासाठीच राजकीय पक्षाच्या प्रमुखाने, त्यांच्या उमेदवारांनी त्या त्या मतदारसंघातील मतदारांना हमीपत्र, प्रतिज्ञापत्र त्यांच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यातून जाहीर करावे.
निवडून आल्यानंतर त्या काळातील पांच वर्षे पक्ष बदलणार नाही,पक्षाशी गद्दारी करणार नाही. तसे करायची वेळ आली तर लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा देईन.
तरच मतदारांची विश्र्वास अर्हता वाढेल, त्याच बरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह, विश्र्वास वाढीस लागेल.
जो उमेदवार याची ग्वाही देईल त्यालाच मतदान करावे,तरच लोकशाही निकोप आणि विश्वसनीय राहिल.
त्यासाठी मतदारांनो सावध आणि डोळसपणे मतदान करा.
ॲड.मनमोहन चोणकर,विलेपार्ले पूर्व मुंबई
मो.9820380853