महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटक सचिव पदी दत्ता घोडके
अतनूर / प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर-गव्हाण येथील रहिवासी तथा मुंबई येथील मंत्रालयात सहाय्यक स्वीय सहाय्यक पदावर गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून कार्यरत असलेले स्वीय सहायक दत्ता कामाजी घोडके यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र राजाच्या संघटक सचिव पदावर यांची नियुक्ती केली आहे.
त्यांना शनिवार रोजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.