पोलिसांकडून १ लाख ४६ हजार रुपयांचे कच्चे रसायन व तयार गावठी दारु हस्तगत
मूर्तिजापूर - तालुक्यातील मधापूरी येथे दोन ठिकाणी अवैध गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती माना पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी ५ वाजता अचानक धाड टाकली. घटनास्थळी दारू निर्मितीचे साहित्य व अन्य वस्तू आढळून आल्या. तसेच घटनास्थळी १ लाख ४६ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार गावठी दारू आढळून आली. त्यावर कारवाई करत ते उद्ध्वस्त करण्यात आले. या धडक कारवाईने परिसरातील गावठी दारू हातभट्टी चालविणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर त्यांनी मधापुरी येथे सुरू असलेल्या दोन ठिकाणी अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकण्यासाठीउपनिरीक्षक गणेश महाजन सहा पो उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे ,पो हे का दिपक सोळंके , पो का मंगेश पवार
यांच्यासह ईतर पोलीस स्टॉफ व दोन पंच असे माना पोलीस स्टेशन येथून रेड कामी लागणारे इतर साहित्य घेवून वाहनाने रवाना केले.तेथे पोहचल्यावर बातमीची खात्री केली असता दोन जण वेगवेगळ्या ठिकाणी मधापुरी शिवारात आडोशाला असलेल्या झुडपात तीन दगडांच्या चुलीवर एक मोठी लोखंडी टाकी ठेवून त्यात काठीने काही तरी हलवताना दिसला. पोलिसांनी त्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून मुद्देमालासह साहित्य जप्त केले . आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले . सदर प्रकरणी माना पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
* असा आढळला मुद्देमाल *
लोखंडी टिपात २३५ लिटर तयार गावठी दारू , तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ, मोह, नवसागर मिश्रीत कच्चे रसायन १५ लिटर मापाच्या लोखंडी टिपात असलेले गुळ, मोह, नवसागर मिश्रीत पक्के उकळते रसायन १ हजार लिटर मुद्देमालाची किंमत १ लाख ४६ हजार रूपयांचा माल नष्ट केला.
या पथकाने टाकली धाड
मधापुरी येथील कारवाईसाठी ठाणेदार सुरज सुरोशे यांच्यासह उपनिरीक्षक गणेश महाजन , सहा पो उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे , पो.हे.कॉ. दिपक सोळंके, पो.कॉ. मंगेश पवार व ईतर सहकाऱ्यांनी अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकली.