सिंदगी मोहपुर येथे दुर्गादेवी चे विसर्जन शांती व भक्तिभावाने

 


गावाकडची बातमी,अनिल बंगाळे : सिंदगी मोहपुर तालुका किनवट येथे दुर्गादेवी चे विसर्जन शांती व भक्तिभावाने करण्यात आले.



यावेळी गावचे पोलीस पाटील बालाजी वानखेडे पाटील यांच्या उपस्थितीत गावचे सरपंच परमेश्वर नारायण खोकले माजी पंचायत समिती सदस्य तथा सिंदगीचे ज्येष्ठ नागरिक प्रेमसिंग नाईक जाधव, बालाजी शिरोडकर उपसरपंच दत्ताजी चिकणे , उत्तमरावजी धुपे तंटामुक्ती अध्यक्ष मेरसिंग जी महाराज दोन्ही दुर्गादेवीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचा मोलाचा सहभाग ही मिरवणूक पार पाडण्यासाठी गावचे पोलीस पाटील बालाजी वानखेडे यांना गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक संपन्न झाल्याच्या नंतर सत्कार करण्यात आला.यावेळी हजारो भाविकांचा सहभाग होता.

Post a Comment

Previous Post Next Post