सर्व धर्म समभाव या पंक्तीप्रमाणे विविध जाती धर्माचे लोक या भारत मातेच्या सृष्टीवर आपल्या रूढी,परंपरा एकत्र गुण्यागोविंदाने साजरे करतात. त्यातील एक नवरात्र सण शहरात, गावात, वाडीत, चाळीत, गल्लो गल्लीत, वसाहतीत. अशीच एक आमची वसाहत प्रजापती म्यॅगनम, द्रोणागिरी, उरण. नेहमीच महिलांचा उत्साह संगीत, गायन, नृत्य यामध्ये अग्रेसर असतो. मंगळागौर नंतरच गरबा खेळण्याचे वेध महिलांमध्ये रचले गेले आणि सातत्याने सराव सुरु केला. सांस्कृतिक समिती नेमली गेली. श्री अरुण तायडे - उत्साही मूर्ती, सौ पूजा नारकर, सौ मीना दास , सौ रिद्धी पारीख, डॉक्टर वर्षा कुडाव हे समितीचे मानकरी निवडून आले. यांच्या सभा वारंवार होऊन कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आणि आयोजन याचे ते रचनाकार होते. आर्थिक व्यवस्था, भव्यदिव्य मंडप, रोषणाई, अंबे माता स्थापना, गरबा,खान पान सेवा अशा उत्कृष्ट व्यवस्थापनेत नवरात्रीचे आयोजन झाले होते. देवींची स्थापना, आरती, आराधना, आलोचना भक्तिमय वातावरण रहिवाश्यामध्ये निर्मिती झाली होती. सर्वं धर्म राहिवाशी एकाच मंडपात ईश्वराशी एकरूप होताना पाहिले होते. अंबे मातेचे स्वागत महिलांनी गरबा नृत्याने केला होता जणूकाही त्या नृत्यागना भासत होत्या. सौ रिद्धीने पारंपारीक नृत्याचे प्रशिक्षण दिले होते. लहान मुले, तरुण, महिला, पुरुष यांनी मनसोक्त गरबा खेळून नवरात्रीचा जल्लोष केला होता. डोळ्याचे पारणे तरुण पिढीचा गरबा पाहून फिटत होते. खान पान सेवेचा आस्वाद
घेत लोक एकमेकांना भेटत होती. सामाजिक एकजूट या नवरात्रीच्या निमित्ताने पहायला मिळत होता. या निमित्ताने सर्वं एकमेकांना आलिंगन देत होते. संवाद करीत होते. आयोजकांना शाब्बासकीची थाप आणि आभार प्रदर्शित करीत नवरात्रीची सांगता झाली.
सौ माधुरी भोईरकर
द्रोणागिरी