चिपळूण- शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखविण्यात शिक्षकांचे समर्पण,मार्गदर्शन आणि योगदान महत्वाचे आहे.५सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस.भारतात हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.त्याच अनुषंगाने जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कोंडमाळा नं.१ता.चिपळूण या शाळेतील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्थेचे सदस्य अरविंद सुर्वे यांच्या हस्ते गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे विनोद घाणेकर आणि वैभव घाणेकर शिक्षक,विद्यार्थी,स्वयंपाकी,मदतनीस व इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष बुधाजी कदम, श्वेता जोशी,माधवी चितळे,नेहा मोरे,.नंदराज पवार,विजया कोंडविलकर,कल्याणी खापरे,प्रमिला पाटेकर,सौ.दिशा घाणेकर,यांचा जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे अरविंद सुर्वे यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया कोंडविलकर यांनी केले.मुख्याध्यापक संतोष कदम यांनी आभार मानले.चहापान करुन कार्यक्रमाची सांगता झाली.