डोंबिवली (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
आयुष्यात आपण सुरुवात श्रीगणेशानेच करतो.त्याच अनुषंगाने गणेश चतुर्थी दिवशी डोंबिवलीती क्षितिज मतिमंद मुलांच्या शाळेत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.मुलांनी व शिक्षकांनी फुलांची आरास तसेच रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा लावुन सजावट करण्यात आली होती.त्याचवेळी क्षितिज मतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षक दिनही साजरा करण्यात आला. आयुष्यात शिक्षकांचे योगदान महत्वपुर्ण आहे. आईवडीलांच्या नंतर शिक्षक हे आयुष्यातील पहिले गुरु आहेत. ५सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस. हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.त्याच अनुषंगाने डोंबिवली येथील क्षितिज मतिमंद मुलांच्या शाळेतील शिक्षिकांना जनजागृती सेवा संस्थेचे सदस्य श्री.प्रकाश सणस यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि क्षितीज संस्थेच्या अध्यक्षा सौ.अनिताताई दळवी, सचिव रजनी कदम,खजिनदार सौ.लक्ष्मी रंगनाथन,श्री.प्रकाश सणस यांच्या हस्ते मुख्याध्यापिका सौ.सुरेखा गायकवाड, सौ.शितल सुर्यवंशी, कुमारी.अनुसया गुरव,सौ.मृणाल कुलकर्णी,सौ.विजया शिंदे,सौ. अक्षदा दरेकर, श्री.दीपक साळुंखे, आशिश पाटील, बाळासाहेब ढगे यांना जनजागृती सेवा संस्थेचे आकर्षक" सन्मानपत्र" देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन शाळेतील शिक्षिकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.