माया नगर आरोग्य वर्धनी केंद्रात महिला व बाल रोग निदान शिबिर संपन्न

 





अमरावती - अमरावती शहरातील हमालपुरा आरोग्य केंद्राच्या डॉ मानसी मुरके व डॉ वैशाली मोटघरे यांच्या वतीने महिला व बाल रोग निदान शिबिर आयोजन करण्यात आले होते हे शिबिर अमरावती शहराचे आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला ह्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रुपेश खडसे शहर साथ रोग नियंत्रण अधिकारी ,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अतिश पवार दंत शल्य चिकित्सक , डॉ कौस्तुभ देशमुख बाल रोग तज्ञ , डॉ ओम पडघम वैद्यकीय अधिकारी, डॉ अनुराग खापरी मनोविकार तज्ञ, डॉ माधुरी भट्टड स्त्री रोग तज्ञ ,डॉ नवरे मॅडम , डॉ मनोज पाटील , चेंडेके सर, कृष्णा भाऊ वाघमारे औषध निर्माण अधिकारी, किन्हिकर सर प्रफुल गवई , श्रेयस नाडे उपस्थित होते ह्या रोग निदान शिबिरात दंत तपासणी, महिलांच्या आरोग्य तपासणी , मनोविकार तपासणी, क्षय रोग तपासणी, सिकल सेल तपासणी , ब्लड प्रेशर , शुगर तपासणी , त्वचा रोग तपासणी अश्या विविध प्रकराच्या मोफत तपासण्या करून औषध उपचार देण्यात आला व मोफत मर्दशन सुद्धा करण्यात आले ह्या शिबिरात गोपाल नगर व सर्व सूतगिरणी परिसरातील शेकडो महिला व बाल गोपाल यांनी लाभ घेतला ह्या शिबिरात डॉ मानसी मुरके यांनी महिलांना व बाल गोपल यांना आजाराबाबत मार्गदर्शन केले तसेच डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा डेंग्यू , मलेरिया , चिकन गुणिया व स्वच्छ्ता , राखून प्रतिबंधात्मक उपाय योजणे बाबत माहिती देऊन परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यास जनतेला विनंती केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन खंडारे बहुउद्देशीय आरोग्य सेवक यांनी केले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आशा वर्कर , आरोग्य सेविका व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मदत करून जनतेला शिबिराचा लाभ मिळून दिला.

Post a Comment

Previous Post Next Post