निंभोरा,धामणगाव रेल्वे येथील प्रगतशील व आदर्श शेतकरी नामदेव वैद्य यांना सन 2021- 22 चा स्व. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान
दि.29/9/24 रोजी मुंबई येथे श्री नामदेव वैद्य यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नामदेवराव वैद्य मान्यता प्राप्त व शेतकऱ्यांशी संलग्न असलेल्या राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचे शेतकरी निवड समितीचे सन्माननीय सदस्य आहेत. तसेच राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष आहे. कृषी क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असून स्वतः ते सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आहे.
लहानपणापासून शेती व्यवसायाची नाळ जुळली असल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सतत मदत करण्याची भूमिका नामदेव वैद्य यांची आहे.त्यांना राज्य पातळीवर व केंद्र पातळीवर अनेक कृषी पुरस्कार मिळालेले आहे. त्यांचे सर्व शेतकरी वर्गातून अभिनंदन होत आहे.