पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण संपन्न

 


     

Gavakadachi Batmi 


उदगीर  : पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर मार्फत "किफायतशीर शेळीपालन व्यवसाय" या विषयावर तीन दिवसीय शेेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दि. 18 ते 20 सप्टेंंर 2024 या. दरम्यान आयोजित करण्यात आला. सदर प्रशिक्षणाचे आयोजन डाॅ. नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डाॅ. एन. झेड. गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर हे होते. तर सांगता समारंभ व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून डाॅ. गणेश गादेगावकर हे होते. कार्यक्रमावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. गोपाळ भारकड, विभाग प्रमुख, पशुपरोपजीवीशास्त्र विभाग, डाॅ. जी. आर. चन्ना, उपसंचालक संशोधन आणि प्रशिक्षण समन्वयक डाॅ.प्रफुल्लकुमार पाटील हे उपस्थित होते. या प्रशिक्षणात 24 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणामध्ये विविध विषयांवर 13 व्याख्यानासह 8 प्रात्यक्षिकांव्दारे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डाॅ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सहसमन्वयक डाॅ. विवेक खंडाईत यांनी केले. यावेळी प्रशिक्षण संयोजन समितीचे सदस्य डाॅ. लक्ष्मीकांत कोकाटे, डाॅ. विलास डोंगरे, डाॅ. अशोक भोसले, डाॅ. शरद आव्हाड व इतर प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समिती व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post