समाजाचे अरविंद सुर्वे"राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

 




डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-समाजाचे आपण काही देण लागतो,समाजाप्रती सत्कार्य कराव,साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असणारे व्यक्तीमत्व म्हणजे समाजसेवक अरविंद सुर्वे.त्यांच्या समाजकार्याची दखल पाक्षिक आदर्श रायगड घेतली.नुकताच पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापनदिन अंबरनाथ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी समाजसेवक अरविंद सुर्वे यांना मान्यवरांच्या हस्ते"राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 याप्रसंगी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,गुरुवर्य हभप उमेश महाराज शेडगे,पाक्षिक आदर्श रायगडचे संपादक रमेश सणस,कार्यकारी संपादक शैलेश सणस,उपसंपादक अविनाश म्हात्रे,मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे,प्रेरणा फाऊंडेशनच्या अध्यक्षा दिप्ती गावकर-कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.सत्कामुर्ती सन्मानिय अरविंद सुर्वे यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


Tag : GavakadachiBatmi Eknathsinde Maharashtra #अरविंद सुर्वे #राज्यस्तरीय #समाजभुषण #पुरस्कार #गावाकडचीबातमी

Post a Comment

Previous Post Next Post