अतनूर : सार्वजनिक गणेश महोत्सव चिंचोली च्या वतीने वकृत्व स्पर्धा आयोजित केले होते. उत्कृष्ट स्पर्धा विजेत्यांना आज बक्षीस देण्यात आले. गणेश महोत्सव समिती मंडळाचे अध्यक्ष संग्राम बिरादार, उपाध्यक्ष गणेश बोईनवाड, सचिव शिवकुमार पांगरे व सर्व मंडळाचे सदस्य गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष सुभान गायकवाड, पोलीस पाटील बाबुराव बेळकुंदे, माजी सरपंच संतोष बट्टेवाड, माजी उपसरपंच सुरेश गव्हाणे, दत्तात्रय गिरी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्व विजेत्या चिमुकल्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. माजी सरपंच संतोष बट्टेवाड यांच्याकडून वकृत्व स्पर्धा विजेत्यांना शालेय शैक्षणिक साहित्य देऊन चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अतिशय सुंदर अशी मिरवणूक काढून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
Tag: #चिंचोली #वक्तृत्वस्पर्धा #अतनूर #गावाकडचीबातमी #मराठीबातमी #महाराष्ट्र #भारत #स्पर्धा #gavakadachiBatmi #Maharashtra #India