जातीय सलोखा शिबिर आयोजित करा...रुस्तम शेख यांची मागणी

 






यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत 


यवतमाळ : माहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये दुर्गा उत्सव ईद-ए-मिलाद इत्यादी धार्मिक उत्सव साजरे करण्यात येणार आहे या प्रसंगी ग्रामीण व शहरी भागात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सर्व धार्मिक उत्सव शांतीपूर्वक साजरे करावे .

या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधवा मध्ये समता , बंधुत्वाची भावना निर्माण होऊन पर्यायाने राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हावी ,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेला आदर्श समाज निर्माण व्हावा या उद्देशाने जातीय सलोखा शिबिर आयोजित करावे अशी विनंती राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदना द्वारे केली आहे .

निवेदन देते वेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन प्रदेश अध्यक्ष इरफान भाई मलनस , सुमित गोहेल , संजय मादेशवार , संतोष मोतेवार इ . उपस्थित होते .


माहे , सप्टेबर , ऑक्टोबर मध्ये आयोजित होणारे दुर्गा उत्सव , इद ए मिलाद इ सर्व धार्मिक सण , उत्सव मध्ये सर्व हिंदू मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन धार्मिक सण शांतता पूर्वक वातावरणात आयोजित करून राष्ट्रीय एकात्मता बळकट करावी असे आवाहन राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन प्रदेश अध्यक्ष इरफान भाई मलनस ,अब्दुल अजीज उर्फ अज्जुभाई ( कळंब)सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.



Tag : #gavakadachiBatmi #Maharashtra #India #cmMaharashtra  #yavatmalnews #Maharashtrapolice #Batmiyavatmal #यवतमाळ #मराठी बातमी #गावाकडचीबातमी #जातीय_सलोखा_शिबिर_आयोजित_करा #रुस्तमशेख 


Post a Comment

Previous Post Next Post