मुख्यमंत्र्याला उमेद ची लाडकी बहिणी बांधणार एक कोटी राखी
महाराष्ट्रातून लाखो बहिणी निघाल्या मुंबईच्या दिशेने
धामणगाव तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे
धामणगाव रेल्वे- मुख्यमंत्र्यांनी उमेदच्या महिलांना राखीची भेट म्हणून न्याय द्यावा अशी मागणी करत अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येत महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी रविवारी मुंबईला रवाना झाल्या . विभाग कायम करा सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कायम करा महिला कॅडर, आशा आणि अंगणवाडी सेविकांचा दर्जा द्या.
या प्रमुख मागण्यांसाठी उमेद कल्याणकारी कर्मचारी संघटनेचे नेतृत्वात मोठ्या संख्येने महिला मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत . महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिलां तर्फे बनवण्यात आलेल्या एक लाखाच्या घेऊन मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावरती त्यांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत .
मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी महिला सक्षमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्यात त्या योजनांसाठी त्यांचा स्वागत आहे ,मात्र अजूनही उमेद संघटनेची रास्त मागणी मुख्यमंत्रींनी मान्य केली नाहीये किंवा त्याबाबत घोषणा केली नाहीये असे यावेळी महिला म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य करावी अशी विनंती या महिलांनी केली आहे. आज आम्ही सर्व लाडक्या बहिणी सन्माननीय आपले लाडके व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधायला निघालेलो आहे.
अमरावती जिल्ह्यातून प्रत्येक महिलांनी गायलेले आहेत आज आमच्या अमरावती जिल्ह्यातून वीस मिनिटात व खर्च आणि निघालो आहे, आम्ही आणि आमचे लाडके भाऊ शिंदे यांना विनंती आहे की सगळं लाडक्या बहिणी तुमच्यापर्यंत येत आहोत, राखीची भेट म्हणून त्यांनी आमच्या मागणी आहे ज्या आमच्या जास्त मागणी आहे तर आमचा उमेद्वार कायम करणे आमचे सन्माननीय सर्वच कर्मचारी यांना कायमस्वरूपी करणे आणि आमच्या महिला आहे.
सर्व महिला कॅडर ,ऑल कॅडर त्यांना आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर सारखे यांचा दर्जा प्राप्त करून देणे असे अध्यक्ष असे राज्य संघटनेच्या अध्यक्ष रूपाली नाकाडे यांनी आपली भावना व्यक्त केली.
Tag : #GavakadachiBatmi #राखी #Maharashtra #मराठीबातमी #उमेद #गावाकडचीबातमी #महिला #बचतगट #cmMaharashtra #India #अमरावती