उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये गेल्या वीस वर्षापासून एकनिष्ठ केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच कुठलाच राजकीय वारसा पाठीशी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्य ओबीसीसेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सहीने हे नियुक्तीपत्र बालाजी सोपानराव परगे देण्यात आले.
या निवडीचे नियुक्तीपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बालाजी परगे यांना देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात नक्कीच पक्षवाढीसाठी मी माझे योगदान देईन. या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव आखाडे, क्रिडामंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, अहमदपूर चे आ.बाबासाहेब पाटील, उदगीर खरेदी विक्री संघाचे भरत भाऊ चामले, उदगीर तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, माजी सभापती बाबासाहेब काळे पाटील, विजय येडले उपस्थित होते.