युवाशक्ती ग्रामविकास संगठन च्या धरणे आंदोलनाला यश

  



ग्रामपंचायती मध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली होणार सुरू



 विषेश प्रतिनिधी, प्रमोद घाटे -     सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करावी या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या समोर युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे धरणे आंदोलन सुरू होते आंदोलन तीव्र होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाने आंदोलकांनची मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्य या गरामविकासाशी निगडित भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करत असलेल्या संगठन च्या वतिने ६ जून २०२३ ला संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन करून ग्रामसेवकांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले होते ग्रामविकास मंत्रालय स्तरावरुन या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास विभागाने २४ऑगष्ट२०२३ रोजी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसे पत्र काढून बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी असे पत्र काढले होते. परंतु या आंदोलनाला १ वर्षे पूर्ण झाले तरीही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू केली नव्हते सदर आदेशाला २४ ऑगस्ट २०२४ ला १ वर्षे पूर्ण झाले या वर्षोपुरती‌च्या निमित्ताने युवाशक्ती ग्रामविकास संगठनेने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी दिनांक २६ ऑगष्ट२०२४ पासून जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी २७ ऑगष्ट ला जिल्हा परिषद प्रशासना कडून‌ युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या दोन्ही मागण्या मान्य करत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये पुढील ३ महिन्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले गेले.

       युवाशक्ती ग्रामविकास संगठन चे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष सुनील कदम, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा तरडे, जिल्हा सचिव तेजस चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख विवेक चव्हाण,राजू सकटे, विनोद ननावरे, किशोर शेळके,गोरख वाघ, अनिल कारंडे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.


Tag#गावाकडचीबातमी #मराठीबातमी #महाराष्ट्र_पोलीस #ग्रामपंचायत #ग्रामसेवक #ग्रामपंचायत_कार्यालय_सचिव #जिल्हापरिषद #पंचायतसमिती #युवाशक्ती_ग्रामविकास_संघटना #बायोमेट्रिक_हजेरी_प्रणाली #Maharashtra #ग्रामविकासमंत्री #मुख्यमंत्री_महाराष्ट्र  #gavakadachiBatmi #युवाशक्तीग्रामविकाससंघटन 

Post a Comment

Previous Post Next Post