डि फार्मसी एक्झिट परिक्षा शुल्क कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी... खासदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन
विशेष प्रतिनिधी प्रमोद घाटे. अमरावती/दि ३० काही दिवसांपूर्वी नुकतेच पिसीआय फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणी एनबीईएमएस नॅशनल बोर्ड ऑफ ऐक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या डि फार्मसी एक्झिट परिक्षेच्या शुल्कात अनावश्यक वाढ करण्यात आली आहे. सध्या या परिक्षेचे शुल्क पाच हजार नऊशे रूपये इतकी आहे,जे अत्यंत जास्त आहे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी फी भरणे कठिण आहे अनेक विद्यार्थी गरिब व कमि उत्पन्न असलेल्या कुटुंबामधून येतात त्यामुळे हे शुल्क त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. तसेस परिक्षेसाठी आधी केवळ आठ विषयांचा अभ्यासक्रम असतांना.आता त्यात अकरा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा प्रचंड अभ्यासक्रम इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे अवघड आहे शिवाय एनबिईएमएस आणि पिसीआय यांच्याकडून प्रस्तावित तिन पेपरांच्या स्वरूपा ऐवजी ऐकच पेपर घेण्यात यावा अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली. पासींग टक्केवारी पन्नास टक्के वरुन चाळीस टक्के टक्केवारि करावी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या आर्थिक परिस्थिती चा विचार करून डी फार्मसी एक्झिट परिक्षेचे शुल्क कमी करण्यात यावे आणि परिक्षेचे स्वरूप अधिक सुगम आणि सोईस्कर बनवावे याकरिता अमरावती येथील डि फार्मसी विद्यार्थी अभिजित सोळंके,यश गाडबैल,ॠषिकेष गाडगे,सनी पतंगराय,पियुष पडोळे, हिमांशू तिखे, पुर्वेश बहुरूपी, वेदांत इंगळे, दिपक बारस्कर,रसिका आडणे,पियुष मुंदडा व इतर विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हा अधिकारी व अमरावती लोकसभा मतदारसंघ चे खासदार बळवंत वानखडे यांच्याशी चर्चा करून नीवेदन दीले व आम्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली.
Tag - #gavakadachibatmi #Maharashtra #India #बळवंतवानखडे #अमरावती #गावाकडचीबातमी #जिल्हाधिकारीअमरावती